Posts archive for: March, 2008
  • title-3869480

    वास्तवाचे कटुत्व

    आयुष्याच्या विस्कटलेपणावर वैतागलेली ती
    घरातील कानाकोपरा आवरावा तशी मनाला आवरते
    कोनड्यात अस्ताव्यस्त कपडे
    सगळीकडे मुलांनी पसरलेली पुस्तके
    कागदाचे कपडे आवरता आवरता
    नाकी नऊ येतातच, तशीच
    ती मनाच्या कानाकोपऱ्यातील कचरा
    आवरते पुन्हा पुन्हा आणि वैतागतेही पुन्हापुन्हा
    एक कोपरा आवरून झाला की पुन्हा दुसरा
    असे सतत सुरूच असते तिचे आवरणे
    आणि मुलांचे पुन्हा केर कचरा करणे
    तद्वतच मनातील सुप्त आशा इच्छा आकांक्षांचो कोनाडे
    ती आवरतेच आहे कित्येक दशके
    ंचा पसारा, मनाचा आवारा
    कोणतीच गोष्ट व्यवस्थित राहत नाही,
    तेव्हा ती कातावते पुन्हा पुन्हा
    दोष देते स्वतःलाच
    आयुष्य म्हणजे तडजोड हे
    तिला ठावून असूनही
    तिचे वैतागणे सुरूच
    दशकानुदशके, मागे वळून पाहताना
    ती दचकते क्षणभर, कुठे आहे?
    कुठे आहे, ते स्वप्नांचे आयुष्य?
    एकच भोवती सत्य वास्तवाचे कटुत्व!

    - प्रकाश रामचंद्र क्षीरसागर,
    ताळगाव, गोवा

  • poem

    मैं अपनी कहानी सुनाता हूँ
    आजकल मैं अपनी कहानी सुनाता हूँ
    अपने आपकोही।
    किसीको समय नही है।
    चाहत भी नही है।
    दुसरोंका छोडो मुझे अपनेको भी
    समय कहा की मै अपने
    दिल की बात सुन लू।
    फिरभी कभी कभी
    दिल चाहता है
    की मै अपनी कहानी सुन तो ले लुंगा
    मनही मन मे केवल

    - प्रकाश रामचंद्र क्षीरसागर,
    ताळगाव, गोवा (403002)

Footer:

The content of this website belongs to a private person, blog.co.uk is not responsible for the content of this website.